• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. free entry to all asi heritage monuments independence day azadi ka amrit mahotsav dpj

Photos : स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यटकांसाठी खास ऑफर; ५ ते १५ ऑगस्ट दरम्यान भारतातील ‘या’ प्रसिद्ध स्थळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) द्वारे संरक्षित सर्व स्मारके आणि स्थळांवरील प्रवेश ५ ऑगस्टपासून १० दिवसांसाठी विनामूल्य असल्याचे सरकारने घोषित केले आहे.

Updated: August 5, 2022 18:46 IST
Follow Us
  • अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव संभाजीनगर जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत.
    1/10

    अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव संभाजीनगर जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत.

  • 2/10

    लाल आणि गुलाबी वाळूच्या दगडापासून बनवलेला हवा महल जयपूरमधील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. ‘पॅलेस ऑफ विंड्स’ म्हणूनही ओळखले जाणारे, हे १९९९ मध्ये बांधले गेले होते. हिंदू आणि मुस्लिम वास्तुकलेचे मिश्रण असलेला हा हवा महल लहान खिडक्या किंवा झरोखांसाठी प्रसिद्ध आहे. (एक्सप्रेस संग्रह)

  • 3/10

    हिडिंबा देवी मंदिर हिमाचल प्रदेशातील मनाली येथे आहे. हे हिडिंबी देवी किंवा हिरमा देवी यांना समर्पित एक प्राचीन गुहा-मंदिर आहे.

  • 4/10

    हुमायूनची कबर ही मुघल बादशहा हुमायूँ याचे थडगे आहे. यावर इराणी वास्तुकलेची छाप आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात ह्या कबरीचा समावेश होतो.

  • 5/10

    भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना समर्पित दोन मंदिरांचा समावेश असलेले, ममल्लापुरममध्ये स्थित द शोर टेंपल हे दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन संरचनात्मक मंदिरांपैकी एक आहे. (एक्सप्रेस संग्रह)

  • 6/10

    कोणार्क येथील सूर्य मंदिर हे तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंहदेव (इ.स. १२३६ – १२६४) याने करविली. हे मंदिर ओडिशा राज्याच्या कोणार्क गावामध्ये असून ते युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे.

  • 7/10

    पर्यटक आणि स्थानिकांमध्ये लोकप्रिय असलेला नीमराना किल्ला. सुंदर कलाकृतीसाठी हा किल्ला ओळखला जातो. या किल्ल्यात असणाऱ्या पायऱ्या जितक्या आकर्षक आहेत तितक्याच चढाईसाठी अवघड असल्याचे सांगण्यात येते.

  • 8/10

    विटांनी बांधलेल्या या कुतुब मिनारची उंची ७३ मीटर आहे. जगातील हा सर्वात उंच मिनार आहे. याला व्हिक्टरी टॉवर म्हणूनही ओळखले जाते. दिल्लीच्या शेवटच्या शासकाचा पराभव केल्यानंतर मुघल वर्चस्वाचा ठसा उमटवण्यासाठी हे स्मारक बांधण्यात आले. ( फोटो- एक्सप्रेस संग्रह)

  • 9/10

    लाल किल्ला. दरवर्षी या ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारताचे वैभव मानल्या जाणाऱ्या या किल्ल्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय सैन्य दलांचे पथसंचलन आयोजित केले जाते.

  • 10/10

    आग्राच्या ताजमहालमध्ये मुघल साम्राज्याचा पाचवा सम्राट शाहजहान, त्याची पत्नी मुमताज महल यांच्यावरील अमर्याद प्रेम दर्शविणारी एक उत्कृष्ट संगमरवरी रचना आहे. (Getty Images/Thinkstock)

TOPICS
ताज महालTaj Mahal

Web Title: Free entry to all asi heritage monuments independence day azadi ka amrit mahotsav dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.