-
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी (८ सप्टेंबर) रोजी वयाच्या ९६ वर्षी निधन झालं.
-
त्यांनी स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती खराब होती आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते.
-
१९५२ साली त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर आल्या होत्या.
-
मागील ७० वर्षांपासून त्यांनी ब्रिटनची महाराणी हे पद सांभाळले.
-
त्यांच्या निधनानंतर आता पुढचा उत्तराधिकारी कोण असेल, याबद्दल जाणून घेऊया.
-
महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि राजकुमार फिलिप यांना चार्ल्स, एडवर्ड, एंड्रयू ही मुले आहेत. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव राजकुमारी एनी असं आहे.
-
यापैकी चार्ल्स सर्वात थोरले असल्याने ब्रिटनचे नवे सम्राट म्हणून त्यांना घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी केमिला पार्कर नव्या महाराणी असतील.
-
चार्ल्स यांना विलियम आणि हॅरी ही दोन मुले आहेत. विलियम यांनी केट मिडिलटन यांच्याशी लग्नगाठ बांधली असून त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.
-
अभिनेत्री मेगन मार्कलशी लग्न केल्यामुळे चर्चेत आलेले हॅरी २०२० मध्ये त्यांच्या कुटुंबियांपासून वेगळे झाले. त्यांना दोन मुले आहेत.
-
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पुत्र एंड्रयू यांना दोन मुली आहेत.
-
राजकुमार एडवर्ड हे महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे तिसरे पुत्र आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
-
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची मुलगी राजकुमारी एनी हिने दोन विवाह केले आहेत. राजकुमार पीटर फिलिप्स आणि जारा डिंटल ही दोन मुले आहेत.
-
महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि त्यांचे कुटुंबीय.
-
(सर्व फोटो : Reuters)

भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिल आऊट की नॉटआऊट? रोहित शर्मा थेट अंपायरला भिडला अन्….पाहा Video