-
१४ फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणून साजरा केला जातो. सगळीकडे प्रेमाचे वारे वाहत असताना खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनीही व्हॅलेंटाइन डे साजरा केला.
-
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने रवी राणा नवनीत राणाांना खास कॉफी डेटवर घेऊन गेले होते.
-
राजकीय वर्तुळातील लोकप्रिय व रोमँटिक कपल म्हणून नवनीत राणा-रवी राणा यांच्याकडे पाहिलं जातं.
-
परंतु, नवनीत राणा-रवी राणा यांचा पती-पत्नी होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
-
नवनीत राणा अभिनेत्री असल्यामुळे त्या ग्रामीण भागात रुळतील का, अशी शंका रवी राणा यांच्या आईला होती.
-
नवनीत राणा-रवी राणा यांची पहिली भेट रामदेव बाबांच्या आश्रमात झाली होती.
-
रामदेव बाबांच्या शिबिरात सहभागी होण्यासाठी ते दोघेही आले होते. तेव्हाच पहिल्यांदा ते एकमेकांना भेटले.
-
त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
-
लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनीही कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. पण सुरुवातीला दोन्ही कुटुंबियांकडून त्यांच्या लग्नाला मान्यता नव्हती.
-
अभिनेत्री असण्याबरोबरच धर्माने पंजाबी असलेल्या नवनीत राणा यांना घरची सून करुन घेण्यात रवी राणा यांच्या आई साशंक होत्या.
-
तर रवी राणा राजकीय क्षेत्रातून असल्यामुळे नवनीत राणा यांच्या कुटुंबियांनाही थोडी शंका होती.
-
पण रामदेव बाबांनी यात मध्यस्थी करुन नवनीत राणा-रवी राणा यांच्या लग्नाचा तिढा सोडवला.
-
नवनीत राणा-रवी राणा यांच्या कुटुंबियांशी रामदेव बाबांनी संवाद साधला आणि दोघांबद्दल खात्री पटवून दिली.
-
त्यानंतर नवनीत राणा-रवी राणा यांच्या कुटुंबियांनी लग्नाला होकार दिला.
-
नवनीत राणा-रवी राणा यांनी व्हॅलेंटाइन डेनिमित्त दिलेल्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.
-
नवनीत राणा-रवी राणा २०११मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे.
-
(सर्व फोटो: नवनीत राणा/ इन्स्टाग्राम)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या