-

Gauri Sawant Interview: तृतीयपंथींच्या आयुष्याच्या खाचखळग्यांचं दर्शन घडवणारा ‘ताली’ सिनेमा तृतीयपंथी समुदायाचे नेतृत्व करणाऱ्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित आहे
-
गौरी सावंत यांच्यासारख्या अनेक नेतृत्वांनी तृतीयपंथींच्या प्रगतीसाठी लढून आपले हक्क मिळवले आहेत.
-
साहजिकच, ज्यांना समाजाचा भागच मानलं जात नव्हतं त्यांच्याविषयी अनेक सांगोपांगी गोष्टी चर्चेत येणं हे साहजिक आहे. अशाच काही गैरसमजुतींवर ‘बस बाई बस’ या शोमध्ये गौरी सावंत यांनी उत्तर दिलं आहे.
-
गौरी सावंत सांगतात, मला रिक्षाने येता जाता पण कित्येकदा रिक्षावाल्यांनी विचारलं आहे की तुमच्यात मृतदेहांना चपलेने मारतात का? तुमच्या समुदायातील मृताची प्रेतयात्रा पाहिली तर माणूस श्रीमंत होतो का?
-
यावर उत्तर एकच आहे की आम्ही पण माणसं आहोत आणि आम्हालाही मृत्यू तेवढाच दुःखद आहे, चपलेने मारणं या निव्वळ अफवा आहेत
-
एखाद्याच्या निधनानंतर जसे शेजारपाजारचे चार खांदेकरी त्या मृतदेहाला घेऊन जातात व त्यांच्या धर्म व जीवनशैलीनुसार अंत्यसंस्कार केले जाते.
-
आणखी एक प्रश्न म्हणजे तृतीयपंथींची अंत्ययात्रा पाहिल्यावर श्रीमंत होता येतं का?
-
यावर गौरी सावंत म्हणाल्या की, मी आयुष्यात एवढ्या जणांचे मृत्यू पाहिले मी काय श्रीमंत झाले का? असाही प्रश्न करून गौरी सावंत यांनी हा मुद्दाही अंधश्रद्धा असल्याचे सांगितले.
-
गौरी सावंत म्हणतात की, “जर मला पुढचे कितीही जन्म मिळाले तर मी पुन्हा हाच जन्म घेईन”.
तृतीयपंथींची अंत्ययात्रा पाहून तुम्ही श्रीमंत होता? गौरी सावंत यांनी दिलं उत्तर, चपलांनी मारण्याच्या चर्चांवर म्हणाल्या..
Gauri Sawant: तृतीयपंथींच्या आयुष्याशी जोडलेल्या अनेक प्रश्नांवर गौरी सावंत यांनी एका मुलाखतीत उत्तरे दिली आहेत. त्यातील सर्वश्रुत मुद्दा म्हणजेच तृतीयपंथींची अंत्ययात्रा पाहिल्यावर खूप पैसे मिळतात का? यावर त्यांचे उत्तर विशेष लक्षवेधी आहे.
Web Title: Gauri sawant answers if watching transgender person deadbody makes anyone rich are trans women man beaten by sandals svs