-
शहरी भागांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत छोटे-मोठे सुपरमार्केट्स उभारलेले तुम्हाला दिसतील.
-
दुकानात यादी घेऊन जाऊन सामान खरेदी करण्यापेक्षा सुपरमार्केटमध्ये जाऊन सामान खरेदी करण्यावर अनेकांचा कल असते.
-
त्यामुळे गेल्या काही दिवसात डी मार्ट किंवा इतर सुपरमार्केट आपल्या परिसरात आलेले दिसतील.
-
मात्र, सुपर मार्केटमध्ये तुम्ही लक्ष दिले असेल तर तुम्हाला खिडक्या दिसल्या नसतील.
-
पण सुपर मार्केटमध्ये खिडक्या का नसतात? याच कारण तुम्हाला माहिती आहे का..? चला आज आपण जाणून घेऊया…
-
सुपरमार्केटमध्ये खिडक्या नसल्यामुळे बाहेर घडणाऱ्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत.
-
बाहेर खूप पाऊस पडत आहे, अंधार पडला आहे अशा गोष्टी न समजल्याने ग्राहक घरी जाण्याची घाई करत नाहीत आणि जास्त वेळ तिथे खरेदी करण्यात घालवतात.
-
सुपरमार्केटमध्ये आलेल्या ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार करुन ही रचना ठरवण्यात आली आहे.
-
सुपरमार्केटमध्ये गेल्यानंतर आपण अनेकदा तिथेच रमून जातो. कारण तिथे खिडक्या नसल्याने आपला बाहेरच्या जगाशी पूर्णपणे संपर्क तुटतो.
-
ग्राहकांनी संपूर्ण लक्ष खरेदीमध्ये असावे, आजुबाजुची दुकानं पाहून त्यांचे लक्ष विचलित होऊ नये, हे सुपरमार्केटमध्ये खिडक्या नसण्यामागचं मुख्य कारण आहे.
-
तसेच काही वस्तू किंवा खाद्यपदार्थ असे असतात ज्यांच्यावर थेट सुर्यप्रकाश पडल्यास ते खराब होण्याची शक्यता असते.
-
अशा प्रकारच्या अनेक वस्तू सुपरमार्केटमध्येही उपलब्ध असतात.
-
जर सुपरमार्केटमध्ये खिडक्या असतील तर त्यांमधून येणारा सुर्यप्रकाश अशा वस्तूंसाठी नुकसानकारक ठरू शकतो.
-
त्यामुळे सुपरमार्केटमध्ये खिडक्या नसण्यामागे हे देखील एक कारण आहे.
-
(फोटो सौजन्य : freepik)

निरीक्षण करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानी केला पॅरामोटरचा उपयोग! Video पाहून नेटकरी म्हणाले; भविष्यात ड्रोन…