-
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २५ सप्टेंबर रोजी भारतीय हवाई दलाला पहिले ‘C-295 टॅक्टिकल मिल्ट्री ट्रान्सपोर्ट’ विमान सुपूर्द केले. ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ या युरोपियन कंपनीकडून भारतीय हवाई दलासाठी हे विमान खरेदी करण्यात आले आहे. भारताने अशी एकूण 56 विमाने २१,९३५ कोटी रुपयांना खरेदी केली आहेत. या विमानाच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाच्या ताकदीत लक्षणीय वाढ होणार आहे. या विमानाची खासियत काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. (पीटीआय फोटो)
-
लष्करी वाहतूक विमान ‘C-295’ ताशी ४८० किलोमीटर वेगाने ११ तास सतत उड्डाण करू शकते. (पीटीआय फोटो)
-
हे विमान १३ हजार फूट उंचीवर उड्डाण करण्यास सक्षम आहे आणि ७०५० किलो वजन उचलू शकते. (पीटीआय फोटो)
-
हे विमान एकावेळी ७१ सैनिक, ५० पॅराट्रूपर्स, २४ स्ट्रेचर आणि ५कार्गो पॅलेट घेऊन जाऊ शकते. (पीटीआय फोटो)
-
आपत्तीच्या परिस्थितीत, या विमानाचा वापर शक्य तितक्या लवकर दुर्गम आणि डोंगराळ भागात आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी केला जाऊ शकतो. (पीटीआय फोटो)
-
विमानाच्या मागील बाजूस एक रॅम्प दरवाजा बांधण्यात आला आहे ज्यामुळे सैनिक किंवा सामान जलद लोडिंग आणिड्रॉपिंग करता येते. (पीटीआय फोटो)
-
हे फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टरच्या हवेतच इंधन भरण्यासाठी वापरले जाऊ शकते. (पीटीआय फोटो)
-
छोट्या धावपट्टीवरूनही हे विमान टेक ऑफ आणि लँडिंग करण्यास सक्षम आहे. ते मऊ, कच्चा, वालुकामय आणि गवताळ धावपट्टीवर सहजपणे उतरू शकते. (पीटीआय फोटो)

“बारामती लोकसभेची जागा लढवणारच,” अजित पवारांचा निर्धार, सुप्रिया सुळे म्हणाल्या…