-
आज २६ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात कृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे. कृष्ण जन्मोत्सवाचा आनंद सर्वत्र पाहायला मिळत आहे.
-
देशातील छोट्या-मोठ्या मंदिरांमध्ये कृष्ण जन्माष्टमीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने कान्हाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.
-
काही मंदिरांमध्ये कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले, त्यामुळे भाविक मोठ्या संख्येने तेथे हजर राहत आहेत.
-
पुण्यातही जन्माष्टमीनिमित्त २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान चार दिवसीय ‘कृष्ण समर्पण’ सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
-
दरम्यान, पुण्यातील इस्कॉन मंदिराची काही छायाचित्रे समोर आली असून, त्यामध्ये भाविकांची रांग दिसत आहे.
-
कृष्ण जन्माष्टमीनिमित्त इस्कॉन मंदिरात विशेष तयारी करण्यात आली आहे. मंदिराला फुलांनी सुशोभित केले आहे.
-
दरवर्षी लाखो भाविक जन्माष्टमीला देशातील प्रत्येक इस्कॉन मंदिरात पोहोचतात. हे लक्षात घेऊन यावेळीही सर्व मंदिरांची भव्य सजावट करण्यात आली आहे.
(एक्स्प्रेस फोटो- अरुल होरायझन)

‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच