-
Chinchpoklicha Chintamani Aagman Sohala 2024 : मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. जसजसा सप्टेंबर महिना जवळ येऊ लागला आहे गणरायाच्या आगमनाची आतुरता वाढत चालली आहे. यामध्येच मुंबईतील लालबाग परिसरातील चिंचपोकळीच्या गणपतीच्या आगमनाची आतुरता गणेश भक्तांना असते. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
चिंचपोकळीच्या चिंतापणीच्या आगमनासाठी दरवर्षी या ठिकाणी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते. आज (३१ ऑगस्ट) रोजी चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडला. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीचा गणपती बाप्पा मंडपात दाखल झाला. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’चा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’ची देखणी मूर्ती पाहायला मिळत आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
चिंचपोकळीच्या बाप्पाला चिंतामणी रंगाचे पितांबर नेसवलेलं आहे. त्यावर निळ्या रंगाचा शेला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. बाप्पाला सोन्या-चांदीचे दागिनेही घातले आहेत. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
चिंचपोकळीच्या बाप्पाच्या प्रभावळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ हे मुंबईतील सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सर्वच भक्तांना या गणपतीच्या आगमनाची चाहूल लागलेली असते. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
चिंतामणीच्या आगमन सोहळ्याल्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातून भाविकयेतात. यामध्ये तरुणांचं प्रमाण मोठं असतं. (Express photo by Sankhadeep Banerjee)

Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”