-
इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर रात्री इराणनेही इस्रायलला चोख प्रत्युत्तर दिलं. या हल्ल्यानंतर इस्रायलमध्येही नुकसान झाले आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. या संघर्षात आतापर्यंत काय घडले आहे ते जाणून घेऊया. (Photo: AP)
-
१.शनिवारी पहाटे इस्रायलच्या दोन प्रमुख शहरांवर, तेल अवीव आणि जेरुसलेमवर इराणने हल्ला केला, ज्यामुळे दोन्ही शहरांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले, त्यानंतर लोक सुरक्षिततेसाठी बंकरमध्ये लपले. (Photo: AP)
-
२.इस्रायली सैन्याने सांगितले की इराणकडून डझनभर क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती, त्यापैकी अनेकांना रोखण्यात आले होते. तथापि, इस्रायली सैन्याने अद्याप इराणी हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला आहे हे सांगितलेले नाही. पण इस्रायलमध्ये अनेक ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, यावरून कळते की इस्रायलला भीषण नुकसान झाले आहे. (Photo: AP)
-
३. इस्रायली मीडिया म्हणत आहे की इराणच्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत आणि अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे. एका महिलेच्या मृत्यूचीही बातमी आली आहे. (Photo: AP)
-
४. चीनने इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला. संयुक्त राष्ट्रांमधील चीनचे राजदूत फू काँग यांनी म्हटले आहे की इस्रायलने इराणच्या सार्वभौमत्वाचे, सुरक्षिततेचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन केले आहे. चीनने इस्रायलला हल्ला त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे. (Photo: AP)
-
५. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी इस्रायल आणि इराणला संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी सांगितले की इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला, त्यानंतर इराणने तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ले केले. आता पुरे झाले. हे थांबवण्याची वेळ आली आहे. शांतता आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीने चर्चा झाली पाहिजे. (Photo: AP)
-
६. इस्रायलने इराणच्या सहा अणुस्थळांवर हल्ला केला. आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये ५० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि शेकडो जखमी झाले आहेत. अनेक अणुशास्त्रज्ञ आणि सुमारे २० लष्करी कमांडर देखील मारले गेले आहेत. (Photo: AP)
-
७. इराणनेही प्रत्युत्तर दिले आणि शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायली शहरांवर हल्ला केला. इराणचा दावा आहे की त्यांनी इस्रायली संरक्षण मंत्रालयालाही लक्ष्य केले आहे. (Photo: AP)
-
८. इस्रायलने इराणविरुद्धच्या कारवाईला ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ असे नाव दिले आहे. इराणने त्याला ‘ट्रू प्रॉमिस थ्री’ असे नाव दिले आहे. (Photo: AP)
-
९. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवरील इस्रायलच्या हल्ल्याला एक उत्तम हल्ला म्हटले आणि इशारा दिला की अजून बरेच काही घडायचे आहे. ट्रम्प म्हणाले, “हे उत्तम आहे. आम्ही त्यांना (इराणला) संधी दिली, पण त्यांनी ती घेतली नाही. आता त्यांना मोठा धक्का बसला आहे आणि अजून बरेच काही घडायचे आहे.” (Photo: AP)
-
१० अमेरिकेने इराणचा इस्रायलवरील हल्ला रोखण्यासही मदत केली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांच्या हवाई संरक्षण प्रणाली आणि नौदलाच्या विध्वंसकांनी इस्रायलला मदत केली, त्यांची बहुतेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. (Photo: AP)
-
(Photo: AP) हेही पाहा- सध्या जगभरात किती विमानं आहेत? कोणत्या एअरलाईन्सकडे सर्वाधिक विमानं आहेत माहितीये का?

अमेरिकेचं पाकिस्तानी लष्करप्रमुखांना ‘आर्मी डे’ परेडचं निमंत्रण? व्हाइट हाऊसकडून पाकिस्तानच्या दाव्यांची पोलखोल