-
India Import Edible Oil: इस्रायल-इराण याच्यातील संघर्ष गेले १० दिवस सुरूच आहे. इराण आणि इस्रायल युद्धात आता अमेरिकेाही सहभागी झाली आहे अमेरिकेने इराणच्या तीन अणु केंद्रांवर हल्ला केल्यानंतर आता इराणने मोठे पाऊल उचलले आहे. (संग्रहित फोेटो)
-
इराणच्या संसदेने अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) म्हणजेच होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. (संग्रहित फोेटो)
-
होर्मुझ सामुद्रधुनी हा जगभरातील तेल व्यापाराासठी खूप महत्त्वाचा मार्ग आहे, येथून जवळपास ३० टक्के जागतिक पेट्रोलियम शिपमेंटची वाहतूक होते. हे बंद करण्याचा निर्णय संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतो. (Photo: PC AP, Wikimedia Commons)
-
जगभरात पुरवठा केले जाणारे तेल आणि एलएनजी याचा जवळपास ३० टक्के हिस्सा याच मार्गावरून जातो. जर हा रस्ता बंद झाला तर तेलाचा पुरवठा कमी होईल आणि किंमती देखील वाढतील. यानिमित्ताने भारत दरवर्षी किती खाद्य तेल आयात करतो? त्यामागची कारणं काय? हा पुरवठा कोणते देश करतात? ते जाणून घेऊयात… (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य: Pexels)
-
भारत दरवर्षी किती खाद्यतेल आयात करतो?
भारत दरवर्षी सुमारे १४० ते १४० लाख टन खाद्यतेल आयात करतो, जी देशाच्या एकूण गरजेच्या ६०-७०% आहे. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य: Pexels) -
भारताची खाद्यतेलाची गरज
भारतामध्ये दरवर्षी सुमारे २३० ते २५० लाख टन खाद्यतेलाचा वापर होतो. यापैकी १४० ते १५० लाख टन खाद्यतेल आयात केले जाते. गेल्या वर्षी, ही आयात १६५ लाख टनांपर्यंत पोहोचली होती असे एका अहवालात म्हटले आहे. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य: Pexels) -
या तेलांची होते आयात
भारतामध्ये पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाची आयात प्रामुख्याने केली जाते. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य: Pexels) -
पुरवठा करणारे देश
इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड भारताला पाम तेलाचा पुरवठा करतो. सोयाबीन तेल अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून आयात केले जाते. तर सूर्यफूल तेल रशिया, युक्रेन आणि अर्जेंटिनाकडून भारताला पुरवले जाते. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य: Pexels) -
आयातीमागील कारणे
देशांतर्गत मागणीच्या तुलनेत खाद्यतेलाचे उत्पादन कमी असल्याने भारताला मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते असे भारताच्या आर्थिक अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य: Pexels) -
कच्च्या तेलाचा पुरवठा
भारत अनेक देशांकडून कच्चे तेल आयात करतो, ज्यामध्ये प्रामुख्याने मध्य पूर्वेकडील देश, रशिया आणि अमेरिका यांचा समावेश होतो. इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, रशिया आणि अमेरिका हे भारताला सर्वाधिक तेल पुरवठा करणारे देश आहेत. अलीकडच्या काळात भारताने रशियाकडून तेलाची आयात वाढवली आहे, कारण रशियाकडून स्वस्त दरात तेल उपलब्ध होत आहे. (प्रतिकात्मक फोटो, सौजन्य: Pexels) हेही पाहा- Photos : ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत प्रचंड उत्साहात माऊलींची पालखी दिवेघाटात; वैष्णवांचा महामेळा सासवडच्या दिशेने…

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया