-
परदेशात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचा व्हिसा, उच्च शुल्काचा खर्च आणि त्या देशाचे नियम या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. शुल्क आणि नियम समजावून घेतले तरी अनेकांना व्हिसाच्या अडथळ्याचा त्रास होतो. ही अडचण लक्षात घेऊन, अनेक परदेशी विद्यापीठांनी अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत, जे अधिक सोपे, परवडणारे व दर्जेदार शिक्षण देणारे आहेत. (फोटो-फ्रीपिक)
-
विदेशात शिक्षण घेताना व्हिसा, शुल्क व स्थानिक नियम हे मोठे अडथळे ठरतात. त्यामध्ये व्हिसाची अडचण सर्वाधिक सामान्य आहे. ही अडचण दूर करण्यासाठी अनेक परदेशी विद्यापीठांनी अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे कोर्सेस कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देतात आणि नोकरीच्या संधींसाठी उपयुक्त ठरतात. (फोटो-फ्रीपिक)
-
वासेदा उन्हाळी सत्र 2025 – जपानमध्ये शिक्षणाची संधी
जपानमधील वासेदा विद्यापीठ जून-जुलैदरम्यान ‘समर सेशन’ घेतं. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमासाठी टुरिस्ट व्हिसावरही प्रवेश मिळतो. जपानबाहेरील कोणतेही विद्यार्थी येथे शिकू शकतात. विद्यापीठ राहण्याची सोयही करून देतं आणि वेगवेगळ्या विषयांवरील दोन-तीन अभ्यासक्रमांचं पॅकेज उपलब्ध असतं. (फोटो-फ्रीपिक) -
एडिनबर्ग विद्यापीठ समर स्कूल – युकेमध्ये नव्या अनुभवाची संधी
यूकेमधील एडिनबर्ग विद्यापीठ दरवर्षी जून-जुलैदरम्यान समर स्कूल आयोजित करतं. हे विशेषतः १६ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी असतं. दोन आठवड्यांच्या या अभ्यासक्रमांमध्ये विद्यापीठातील शिक्षक थेट शिकवतात. होलीरूड कॅम्पस येथे वर्ग घेतले जातात आणि हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विद्यापीठीय दर्जाच्या शिक्षणाचा अनुभव देतात. (फोटो-फ्रीपिक) -
सिडनी एक्झिक्युटिव्ह प्लस – ऑस्ट्रेलियात डिजिटल शिक्षणाची सोपी संधी
ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठाने ऑनलाइन माध्यमातून लघु अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ‘सिडनी एक्झिक्युटिव्ह प्लस’ हा कार्यक्रम अशा व्यावसायिकांसाठी आहे, जे करिअरमध्ये खंड पडू न देता, आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवू इच्छितात. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अॅनालिटिक्स, नेतृत्व अशा विषयांवर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. (फोटो-फ्रीपिक) -
यूबीसी समर प्रोग्राम – कॅनडामध्ये अभ्यासाची रंगतदार संधी
कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया येथे दरवर्षी दोन चार आठवड्यांचे समर प्रोग्राम्स घेतले जातात. जुलै आणि ऑगस्टमध्ये हे अभ्यासक्रम विज्ञान, व्यवसाय, आर्किटेक्चरसह ६० पेक्षा अधिक विषयांमध्ये शिकवले जातात. त्यासाठी विद्यार्थ्यांना टुरिस्ट व्हिसावरही प्रवेश मिळतो आणि त्यांची कॅम्पसमध्ये राहण्याची सोय केली जाते. (फोटो-फ्रीपिक) -
वर्ल्ड लर्निंग प्रोग्राम – अनेक देश, एकाच मंचावर शिक्षण
वर्ल्ड लर्निंग ही संस्था विविध देशांमध्ये अभ्यासक्रम घेते आणि बऱ्याच अभ्यासक्रमांना सरकारकडून निधी मिळालेले असतात. त्यामुळे ते किफायतशीर ठरतात. काही अभ्यासक्रम ऑनलाइन घेता येतात, ज्यामुळे प्रवासाची गरज राहत नाही. इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी यामध्ये खास प्रोग्राम्सही असतात. (फोटो-फ्रीपिक)

२५ वर्षांच्या मुंबईकर तरुणीने अमेरिकेतील ६४ लाखांची नोकरी का नाकारली? म्हणाली, ‘४० लाख रुपये…’