-
नवीन वर्ष २०२६ जवळ येत असताना सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगत आहे. बल्गेरियातील प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांच्या काही जुन्या भविष्यवाण्या पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये येऊ लागल्या आहेत.
-
जगभरातील अनेक लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या सांगितलेल्या अनेक गोष्टी सत्यात उतरल्याच्या कथा आजही मोठ्या प्रमाणात सांगितल्या जातात. त्यामुळेच २०२६ विषयीच्या भविष्यवाण्या समोर येताच लोकांच्या मनात उत्सुकतेचे मोठे वादळ उठले आहे.
-
बाबा वेंगा यांनी २०२६ या वर्षाबद्दल काही भविष्यवाण्या केल्या असल्याचे ज्योतिषवर्तुळात चर्चेत आहे. यापैकी एक भविष्यवाणी अनेकांसाठी आशेची किरण ठरू शकते, कारण चर्चेनुसार २०२६ मध्ये पाच राशींवर धनलाभाचे योग प्रबळ असल्याचं म्हटलं जातं.
-
या वर्षभर वित्तीय वाढ, आर्थिक स्थैर्य आणि गुंतवणुकीला लाभदायी काळ असल्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. अर्थातच, ही माहिती कोणताही दावा नसून केवळ ज्योतिषशास्त्रीय विश्लेषणावर आधारित अंदाज आहे.
-
चला तर मग पाहूया, २०२६ या नवीन वर्षात कोणत्या राशींना यश, पैसा आणि सुख मिळण्याच्या शक्यता वाढू शकतात.
-
बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, २०२६ पासून वृषभ राशीला सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. अचानक धनलाभ, अडकलेली कामं पुढे सरसावणे आणि उत्पन्नाचे नवे मार्ग उघडण्याची चिन्हे आहेत. करिअरमध्ये स्थिरता आणि बचतीत सुधारणा दिसण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते.
-
बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, सिंह राशीसाठी २०२६ हे वर्ष आनंद घेऊन येणारे ठरु शकते. करिअरमध्ये अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. आपल्या कार्यानं समाजात आपला मान-सन्मान वाढू शकतो. प्रगतीचे द्वार खुले होऊ शकतात.
-
बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी २०२६ हे वर्ष फायदेशीर ठरु शकते. करिअरमध्ये बदल, नवीन ऑफर्स किंवा भक्कम संधी समोर येऊ शकतात. घर, एखादी संपत्ती किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा देखील तुमची या काळात पूर्ण होऊ शकते.
-
बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, वृश्चिक राशीसाठी २०२६ हे वर्ष करिअर, प्रतिष्ठा आणि आर्थिक क्षेत्रात नवी उंची गाठण्याचे संकेत देऊ शकते. प्रत्येक कामात भाग्य तुमची साथ देऊ शकतो. पैशाची आवक वाढू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो.
-
बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी २०२६ हे वर्ष शुभ फळ देणारे ठरु शकते. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. नोकरदार आणि उद्योगपतींना लाभ मिळू शकतो. या दरम्यान बँक बॅलन्समध्ये वाढ होऊ शकते.
-
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )
मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार? भाजपातून ४३ जणांचे राजीनामे; काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…