-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे (Sharad Pawar) युवा नेते युगेंद्र पवार (NCP, SP Leader Yugendra Pawar) व तनिष्का कुलकर्णी (Tanishka Kulkarni) यांचा विवाह सोहळा काल, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) जिओ सेंटर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी या खास कौटुंबिक क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
युगेंद्र पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत.
-
तनिष्का कुलकर्णी या मूळच्या मुंबईतील असून त्यांच्या कुटुंबाचा व्यावसायिक पार्श्वभूमी आहे.
-
या कौटुंबिक सोहळ्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते.
-
यामध्ये शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार आणि जय पवार (आणि त्यांची होणारी पत्नी ऋतुजा पाटील) उपस्थित होते.
-
युगेंद्र पवार यांच्या आत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी वरातीमध्ये जोरदार डान्स केला होता.
-
या विवाह सोहळ्याला महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
-
युगेंद्र पवार व तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा ३ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत झाला होता.
-
साखरपुडा सोहळ्यालाही संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
‘Be The Man I Need…’, स्मृतीने लग्न मोडल्याची घोषणा केल्यानंतर जेमिमा रॉड्रीग्जची पोस्ट, VIDEOने वेधलं सर्वांचं लक्ष