-
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे धाकटे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) आणि ऋतुजा पाटील (Rutuja Patil) यांचा शाही विवाह सोहळा काल (५ डिसेंबर) बहारीन येथे थाटामाटात पार पडला.
-
या ‘डेस्टिनेशन वेडिंग’मधील नववधू-वराच्या खास लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
लग्नसोहळ्यासाठी जय पवारने पांढऱ्या रंगाची भरजरी शेरवानी परिधान केली होती, तर वधू ऋतुजा पाटीलने गुलाबी रंगाची नक्षीदार डिझायनर साडी नेसली होती.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या खास सोहळ्यातील काही सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या असलेल्या ऋतुजाबरोबरचा जय यांचा विवाह सोहळा बहारीन (Bahrain) येथे आयोजित करण्यात आला होता.
-
४ ते ७ डिसेंबर या चार दिवसांसाठी हा सोहळा सुरू आहे, ज्यात हळदी, मेहंदी, वरात, मुख्य विवाह आणि स्वागत समारंभ यांसारखे पारंपरिक विधी पार पडत आहेत.
-
हा विवाह सोहळा पूर्णपणे खासगी स्वरूपात आयोजित करण्यात आला होता.
-
यामध्ये पवार आणि पाटील कुटुंबातील सदस्यांसह, फक्त जवळचे नातेवाईक आणि खास निमंत्रित, असे सुमारे ४०० लोक उपस्थित होते.
-
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (NCP) केवळ दोनच प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते.
-
एप्रिल महिन्यात जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार? भाजपातून ४३ जणांचे राजीनामे; काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…