-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा शाही विवाहसोहळा ५ डिसेंबर रोजी बहारीन येथे अतिशय थाटामाटात पार पडला.
-
विवाहसोहळ्याचे सुंदर क्षण ऋतुजा पाटील यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर केले असून, हे फोटो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
या शाही विवाहसोहळ्यात जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी पारंपरिक मराठमोळा लूक केला होता, जो पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
-
ऋतुजा पाटील यांनी गुलाबी रंगाची झळाळती साडी नेसून, नाजूक दागिन्यांसह आकर्षक व पारंपरिक वेश धारण केला होता.
-
जय पवार यांनी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान करून राजेशाही आणि देखणा लूक साधला होता.
-
दोघांचेही फोटो आणि विवाहसोहळ्याचे दृश्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
-
ऋतुजा पाटील यांनी पोस्ट केलेल्या फोटोला ‘Married my bestie’ अशी गोड आणि मनाला भिडणारी कॅप्शन दिली आहे.
-
या शाही विवाहसोहळ्याच्या सजावट, पोशाख आणि वातावरणामुळे हा सोहळा अनेकांच्या नजरेत भरला असून, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा पाटील/इन्स्टाग्राम)
खोकला गेला पण घट्ट कफ फुप्फुसांना चिटकून बसलाय? ‘हे’ एक पान चावून खा; रातोरात मोकळी होईल छाती