-
प्रसिद्ध उद्योगपती यश बिर्ला यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या खाण्याच्या आवडीनिवडीबद्दल खुलेपणाने सांगितले.
-
फिटनेससाठी ओळखले जाणारे बिर्ला यांना खाण्याचा तसा कमी ‘शौक’ आहे, पण जे पदार्थ आवडतात, ते मनापासून खातात.
-
बिर्ला यांचा प्रेमविवाह एका मराठी मुलीसोबत झाला आहे. याच वैवाहिक संबंधांमुळे त्यांचे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि विशेषतः येथील पदार्थांशी अतूट नाते जुळले आहे.
-
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बिर्ला यांनी कबूल केले की, त्यांना त्यांच्या पारंपरिक मारवाडी पदार्थांपेक्षा महाराष्ट्रीयन पदार्थ अधिक प्रिय आहेत.
-
यश बिर्ला यांची जीवनशैली अत्यंत सात्विक असून, त्यांच्या जेवणातही सात्विक पदार्थांचा समावेश असतो.
-
उद्योगपती यश बिर्ला यांना आवडणाऱ्या मराठमोळ्या पदार्थांच्या यादीत पुरणपोळी, आमटी आणि तोंडलीची भाजी यांचा समावेश आहे.
-
बिर्ला यांनी सांगितले की, जेव्हा ते त्यांच्या पत्नीच्या घरी जात असत, तेव्हा त्यांच्या सासूबाई खास त्यांच्यासाठी हे महाराष्ट्रीयन पदार्थ बनवत असत.
-
आपल्या घरात स्वयंपाकात मारवाडी जेवण कमी आणि महाराष्ट्रीयन जेवणच अधिक प्रमाणात बनवले गेले पाहिजे, असा आपला आग्रह असतो, असेही बिर्ला यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : यश बिर्ला/इन्स्टाग्राम)
“हो मी पतीपासून वेगळी राहते”; अभिनेत्रीने अखेर सोडलं नात्याबद्दल मौन, २ वर्षांपूर्वी केलं मराठी उद्योजकाशी लग्न