-
यश बिर्ला आणि अवंती बिर्ला यांची प्रेमकथा अनेक अर्थांनी खास आहे. डेटिंग करण्यापूर्वी हे दोघे तब्बल चार वर्षे खूप चांगले मित्र होते. त्यांची ही मैत्री इतकी घट्ट होती की, त्यांच्यात मैत्रीपलीकडील भावना कधी निर्माण झाल्या, हे त्यांनाही लवकर कळले नाही.
-
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत यश बिर्ला यांनी सांगितले की, एका क्षणी त्यांना जाणवले की, आता हे नाते केवळ फ्रेंडशिपपर्यंत मर्यादित राहिलेले नाही, तर त्याहून अधिक काहीतरी आहे.
-
यश बिर्ला यांच्यासोबतच अवंती यांच्या मनातही हे बदल जाणवले. या कबुलीमुळे त्यांच्या ४ वर्षांच्या मैत्रीचे रूपांतर एका सुंदर प्रेमाच्या नात्यात झाले आणि त्यांच्या डेटिंगच्या प्रवासाला सुरुवात झाली.
-
घरात या नात्याबद्दल सांगताना यश बिर्ला यांच्या कुटुंबात काही अडचणी आल्या. कारण- बिर्ला कुटुंब हे ‘संस्कारी’ आणि पारंपरिक आहे. त्यांच्या मूल्यांमुळे सुरुवातीला थोडा संघर्ष करावा लागला, असे यश यांनी स्पष्ट केले.
-
त्याउलट अवंती यांच्या कुटुंबातही संस्कारांना महत्त्व असले तरी त्यांची जीवनशैली थोडी आधुनिक होती. त्यामुळे त्यांच्या पालकांकडून या नात्याला जास्त विरोध झाला नाही आणि यश बिर्ला यांना अवंती यांच्या घरच्यांकडून मोठा प्रॉब्लेम आला नाही.
-
यश बिर्ला यांनी मुलाखतीत मारवाडी आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीमधील व्यवहाराच्या फरकावरही भाष्य केले. दोन भिन्न कुटुंबांना एकत्र आणताना हे फरक जाणवतात; पण त्यांनी ते सामंजस्याने हाताळले.
-
शेवटी यश बिर्ला यांनी त्यांच्या नात्याच्या आणि जीवनातील यशाचे श्रेय ‘देवावरील विश्वासाला’ दिले. ते म्हणाले, “देवावर विश्वास असेल, तर सगळं बॅलन्स (Balance) होतं.”
-
अशा प्रकारे चार वर्षांची मैत्री, कुटुंबाकडून आलेल्या अडचणी व देवावरील विश्वास या त्रिसूत्रीवर यश बिर्ला आणि अवंती बिर्ला यांची ही अनोखी व यशस्वी लव्हस्टोरी आजही अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : यश बिर्ला /इन्स्टाग्राम)
मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार? भाजपातून ४३ जणांचे राजीनामे; काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…