-
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Congress leader Priyanka Gandhi) आणि रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांचा मुलगा रेहान वाड्रा (Raihan Vadra) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
-
रेहानने मैत्रीण अविवा बेगबरोबर (Aviva Baig) गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
-
रेहानची होणारी पत्नी अविवा बेग ही दिल्लीतील एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे.
-
अविवा आणि वाड्रा कुटुंबियांचे जुने संबंध असल्याचे बोलले जाते.
-
अविवा व्यवसायाने फोटोग्राफर आणि प्रोड्युसर आहे. ती ‘Atelier 11’ या फोटोग्राफी स्टुडिओ आणि प्रोडक्शन कंपनीची सह-संस्थापक देखील आहे.
-
रेहान आणि अविवा गेल्या ७ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.
-
रेहानने अविवाला प्रपोज केल्यानंतर तिने लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हा साखरपुडा पार पडल्याचे समजते. मात्र, अद्याप गांधी किंवा वाड्रा कुटुंबाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
-
रेहानने आपले शालेय शिक्षण दिल्ली आणि डेहराडूनमध्ये पूर्ण केले असून, उच्च शिक्षणासाठी तो लंडनला गेला होता.
-
रेहान एक प्रोफेशनल व्हिज्युअल आर्टिस्ट आणि फोटोग्राफर आहे. त्याला विशेषतः वाईल्डलाईफ फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे.
-
रेहान हा सोनिया गांधींचा नातू (Sonia Gandhi) आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा भाचा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियांका गांधी/इन्स्टाग्राम)
“माझा मुलगा तिच्यापासून विभक्त झालाय…”, हेमलता बाणे खंडणी प्रकरण; अर्चना पाटकर स्पष्टपणे म्हणाल्या, “आमचा संबंध नाही…”