-
Maharashtra Municipal Corporation Election Results 2026: आज, १६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
-
काल १५ जानेवारी रोजी मुंबई (BMC), पुणे (PMC), ठाणे, नागपूर, नाशिक यांसह महत्त्वाच्या शहरांमध्ये मतदान पार पडले होते.
-
भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती (भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना) राज्यातील २९ पैकी २० हून अधिक महानगरपालिकांमध्ये आघाडीवर आहे.
-
मुंबई महानगरपालिकेत भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून ते सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहेत.
-
ठाकरे बंधूंची (उद्धव आणि राज ठाकरे) युती अनेक जागांवर पिछाडीवर दिसत आहे.
-
या ऐतिहासिक यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे त्यांच्या निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
-
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी त्यांचे औक्षण केले.
-
विजयाच्या जल्लोषात अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “हा विजय म्हणजे जनतेने देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आणि गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासकामांवर दाखवलेला दृढ विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनतेने विकासाच्या राजकारणाला कौल दिला आहे.”
Photos: शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांनी शेअर केले दिवाळी सेलिब्रेशनचे खास फोटो