-
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक निधनानंतर रिकाम्या झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
-
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज (३१ जानेवारी) राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ (Maharashtra Deputy Chief Minister Post Oath Ceremony) घेणार आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची निवड करण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे.
-
राजकीय पार्श्वभूमी आणि माहेरचा वारसा सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव जिल्ह्यात झाला.
-
सुनेत्रा पवार यांना माहेरून मोठा राजकीय वारसा लाभला आहे. माजी खासदार पद्मसिंह पाटील हे त्यांचे थोरले बंधू आहेत. यामुळे राजकारणाचे धडे त्यांनी बालपणापासूनच गिरवले आहेत.
-
१९८० मध्ये अजित पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्या अनेक वर्षे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होत्या.
-
‘बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क’च्या माध्यमातून त्यांनी ३,००० हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
-
‘इन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून त्यांनी १ लाखांहून अधिक वृक्षारोपण केले असून प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरणपूरक उत्सवांसाठी मोठे काम केले आहे.
-
विद्या प्रतिष्ठान आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात, तर ‘मार्ट’ संस्थेच्या माध्यमातून कृषी पर्यटनात मोलाचे योगदान दिले आहे.
-
राज्यसभेपासून उपमुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर, प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाली.
-
१३ जून २०२४ रोजी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
-
आता राज्यसभा खासदारकीवरून थेट राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास ऐतिहासिक ठरणार आहे.
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
