-
देशात सध्या नवउद्योगांची लाट वेगाने वाढताना दिसत आहे. विशेषतः अन्न व पेय क्षेत्रातील व्यवसाय झपाट्याने विस्तारत असून, चहाशी संबंधित उपक्रमांना मोठ्या प्रमाणाित पसंती मिळत आहे. चहाच्या नावांबाबत लोकांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतो.
-
‘एमबीए चायवाला‘ आणि ‘चाय सुट्टा बार‘नंतर आता डॉली चायवाला हे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्या चहा देण्याच्या अनोख्या शैलीमुळे ते अल्पावधीतच ओळखीचे चेहरा बनले आहेत.
-
डॉली चायवाला तेव्हा अधिक चर्चेत आले, जेव्हा त्यांचा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यासोबतचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या घटनेनंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ओळख मिळाली.
-
या ओळखीचा पुढचा टप्पा म्हणून डॉली चायवाला यांनी ‘डॉली की टपरी’ या नावाने फ्रँचायजी पद्धतीने व्यवसाय सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा उपक्रम निवडक शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे.
-
फ्रँचायजी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी तीन वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिला पर्याय म्हणजे ठेला मॉडेल, जो लहान स्तरावर सुरू करता येतो.
-
ठेला मॉडेलसाठी सुमारे साडेचार लाख ते सहा लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. कमी भांडवलात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय ठेवण्यात आला आहे.
-
दुसरा पर्याय स्टोअर मॉडेलचा आहे. या पद्धतीत कायमस्वरूपी दुकान उभारण्यात येईल. त्यासाठी अंदाजे २० ते २२ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक आवश्यक आहे.
-
तिसरा व सर्वांत मोठा पर्याय फ्लॅगशिप कॅफेचा आहे. कॅफे स्वरूपातील या आऊटलेटसाठी सुमारे ३९ लाख ते ४३ लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असून, हा पर्याय मोठ्या शहरांमधील प्रमुख ठिकाणांसाठी ठेवण्यात आला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: डॉली चायवाला/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
