-
अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी, १ फेब्रुवारी रोजी सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा भारताचा ८८ वा केंद्रीय अर्थसंकल्प ठरणार असून, त्यातून देशाच्या खर्चाची दिशा स्पष्ट होईल.
-
२०२६-२७ चा आराखडा
हा अर्थसंकल्प आगामी आर्थिक वर्षासाठी कररचना, सार्वजनिक खर्च आणि वित्तीय व्यवस्थापनाचे प्राधान्यक्रम ठरवेल. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. -
दोन अर्थसंकल्पांतील फरक
नागरिकांमध्ये अनेकदा केंद्रीय आणि राज्य अर्थसंकल्पाबाबत गोंधळ असतो. केंद्रीय अर्थसंकल्प हा संपूर्ण देशासाठी असतो; तर राज्याचा अर्थसंकल्प हा केवळ संबंधित राज्याचा वार्षिक आर्थिक तपशील असतो. -
राष्ट्रीय विरुद्ध स्थानिक गरज
केंद्रीय अर्थसंकल्प राष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूक आणि प्राधान्यक्रम ठरवतो म्हणून त्याला ‘देशाचा अर्थसंकल्प’ म्हणतात. राज्याचा अर्थसंकल्प हा स्थानिक गरजा आणि विकास उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतो. -
संविधानाचे कलम ११२
केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी वित्त मंत्रालय करते. संविधानाच्या कलम ११२ नुसार याला ‘वार्षिक आर्थिक विवरण’ म्हटले जाते. हा अर्थसंकल्प संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर होणे आवश्यक असते. -
संविधानाचे कलम २०२
राज्य अर्थसंकल्प राज्याच्या वित्त विभागाकडून तयार केला जातो. कलम २०२ नुसार यालाही ‘वार्षिक आर्थिक विवरण’ म्हणतात. हा अर्थसंकल्प विधानसभेत आणि विधान परिषद असल्यास तिथेही सादर केला जातो. -
केंद्राचे उत्पन्नाचे स्रोत
केंद्र सरकारला प्रामुख्याने आयकर, कॉर्पोरेट कर, सीमा शुल्क आणि जीएसटीमधील वाट्यातून उत्पन्न मिळते. तसेच सार्वजनिक उपक्रमांचे लाभांश आणि परदेशी कर्ज हेदेखील महत्त्वाचे स्रोत आहेत. -
राज्याचे उत्पन्नाचे स्रोत
राज्यांचे उत्पन्न राज्य उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्क, वाहन कर आणि वीज शुल्कावर अवलंबून असते. त्याव्यतिरिक्त राज्यांना केंद्राकडून अनुदान आणि जीएसटीचा वाटाही मिळतो. -
खर्चाचे स्वरूप: केंद्र
केंद्रीय अर्थसंकल्पाचा मोठा हिस्सा रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, संरक्षण आणि देशव्यापी कल्याणकारी योजनांवर खर्च होतो. केंद्र सरकार प्रामुख्याने देशव्यापी धोरणे आणि पायाभूत सुविधा हाताळते. -
खर्चाचे स्वरूप: राज्य
राज्यांचा खर्च स्थानिक प्रशासन, शेती, सिंचन, प्राथमिक आरोग्य, शिक्षण आणि पोलीस व्यवस्थेवर होतो. तसेच, केंद्राच्या तुलनेत राज्यांना मर्यादित कर्ज घेण्याचे अधिकार असतात. (सर्व फोटो सौजन्य :PTI आणि इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
