-
Nirmala Sitharaman Union Budget 2026 Saree Look: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ आज सादर झाला.
-
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी, १ फेब्रुवारी रोजी आगामी आर्थिक वर्षासाठीचा (एप्रिल २०२६ ते मार्च २०२७) अर्थसंकल्प संसदेत मांडला.
-
या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
निर्मला सीतारमण या दरवर्षी अर्थसंकल्पाच्या दिवशी भारताच्या विविध प्रांतांतील वैशिष्ट्यपूर्ण हातमाग साड्या नेसून भारतीय परंपरेचे दर्शन घडवतात.
-
यंदा निर्मला सीतारमण यांनी तामिळनाडूची प्रसिद्ध गडद मरून रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती.
-
या कांजीवरम साडीवर त्यांनी पिवळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान करून आपला लूक पूर्ण केला, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
साधारणपणे रविवारी शेअर बाजार बंद असतो, मात्र अर्थसंकल्पाचे महत्त्व लक्षात घेता आज भारतीय शेअर बाजारात नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू राहणार आहेत.
-
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) हे दोन्ही बाजार आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी गुंतवणूकदारांसाठी खुले राहतील.
-
२०२५ मध्ये आमच्या सरकारने पोकळ भाषणबाजीऐवजी सुधारणांवर लक्ष केंद्रित केले असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.
Sunetra Pawar Oath : सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर, पुन्हा शपथ घ्यावी लागणार?, शपथविधीच्या चार दिवसांतच…
