-
भारतामध्ये अनेक सुंदर आणि निसर्गसंपन्न बेटे आहेत. त्यापैकी एक बेट नारळाच्या प्रचंड लागवडीसाठी विशेष ओळखले जाते. या बेटाला ‘कोकोनट आयलंड’ म्हणूनही ओळखले जाते. (फोटो सौजन्य : Lakshadweep Tourism/फेसबुक)
-
लक्षद्वीपला भारताचे ‘कोकोनट आयलंड’ म्हटले जाते. येथे सर्वत्र नारळाची दाट झाडे दिसतात. लक्षद्वीपच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून नारळाच्या झाडांकडे पाहिले जाते. (फोटो सौजन्य : Lakshadweep Tourism/फेसबुक)
-
लक्षद्वीपची माती, हवामान आणि समुद्री परिस्थिती नारळाच्या शेतीसाठी अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे येथे नारळ हेच प्रमुख पीक घेतले जाते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
अरबी समुद्रात वसलेले लक्षद्वीप केरळ राज्याच्या सर्वाधिक जवळ आहे. येथील रहिवासी नारळापासून तेल काढण्यासोबतच अनेक घरगुती उपयोगांसाठी नारळाचा वापर करतात. (फोटो सौजन्य : Lakshadweep Tourism/फेसबुक)
-
नारळाच्या झावळ्यांपासून छप्पर तयार केले जाते. तसेच, विविध प्रकारची बुनाई केली जाते. नारळाच्या किशांपासून दोरखंड आणि चटया बनवण्याचे कामही येथे मोठ्या प्रमाणावर केले जाते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
लक्षद्वीपमधील कवरत्ती, अँड्रॉट, मिनीकॉय, कलपेनी व अगत्ती या बेटांवर नारळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
देशातील नारळ उत्पादनात केरळ राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
जागतिक पातळीवर नारळ उत्पादनात इंडोनेशिया देश आघाडीवर आहे. त्यानंतर फिलीपीन्सचा क्रमांक लागतो, तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. हे तीन देश मिळून जागतिक नारळपुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
