-
Who is Supriya Sule Son-in-Law: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे.
-
सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे (Sadanand Sule) यांची कन्या रेवती सुळे (Revati Sule) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे (Smruti Shinde) यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.
-
रेवती सुळे यांचा विवाह नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी (Arun Lakhani) यांचा मुलगा सारंग लखानी (Sarang Lakhani) यांच्याशी होणार आहे.
-
सारंग हे नागपूरमधील प्रतिष्ठित ‘विश्वराज ग्रुप’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
-
केवळ यशस्वी उद्योजकच नव्हे, तर सारंग हे एक उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहेत.
-
त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये आपले कसब दाखवले आहे.
-
रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आपले पदव्युत्तर शिक्षण (Masters) पूर्ण केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्मृती शिंदे आणि सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
Sharad Pawar Health Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला, रुबी रुग्णालयात पार्थ पवार आणि जय पवारही उपस्थित
