-
पुण्यातील कारेगाव गावाच्या माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले सोशल मीडियावर चांगल्याच प्रसिद्ध आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे ५ लाख ८० हजार फॉलोअर्स आहेत. (Photo – Instagram /nirmala_shubham_nawale)
-
सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या निर्मला नवले यांना पुणे जिल्ह्यातील शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण मधून अवघ्या ३२९ मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. (Photo – Instagram /nirmala_shubham_nawale)
-
कारेगाव पंचायत समिती गटातून निर्मला नवले यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच नवले यांनी सोशल मीडियावर प्रभावी प्रचार केला होता. त्यांच्या चौक सभा आणि छोट्या रॅलींनाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. (Photo – Instagram /nirmala_shubham_nawale)
-
सोशल मीडियावर त्यांना मिळत असलेला पाठिंबा पाहून त्यांचा सहज विजय होईल, असे बोलले जात होते. मात्र भाजपाच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी त्यांचा पराभव केला. (Photo – Instagram /nirmala_shubham_nawale)
-
आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांची सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता वाढली. मात्र या लोकप्रियतेचा पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना लाभ होऊ शकला नाही. (Photo – Instagram /nirmala_shubham_nawale)
-
पराभवानंतर निर्मला नवले काय म्हणाल्या?
पराभवानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून निर्मला नवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या नेतृत्वावर निस्वार्थपणे जीवापाड प्रेम करणाऱ्या, आणि माझ्या सुख-दुःखात सदैव प्रामाणिकपणे माझ्यासोबत उभे राहणाऱ्या, मी निवडून येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद. (Photo – Instagram /nirmala_shubham_nawale) -
आपण सर्वांनी तुमची निर्मला पंचायत समितीवर जाण्यासाठी मागील दोन महिने जे अथक परिश्रम घेतले, रात्र-दिवस एक करून जे कष्ट उपसले-त्या प्रत्येक प्रयत्नासाठी मी मनापासून ऋणी आहे. हा ३२९ मतांनी झालेला पराभव अनपेक्षित आहे आणि वेदनादायकही तो मी मान्य करते. (Photo – Instagram /nirmala_shubham_nawale)
-
निर्मला नवले यांचे पती शुभम नवले हेही राजकारण सक्रिय आहेत. त्यांनी निर्मला नवले यांच्या वाढदिवसानिमित्त आलिशान रेंज रोव्हर गाडी भेट दिली होती. यावेळी I Want it Anyhow हा निर्मला नवले यांचा इंग्रजी डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला होता. (Photo – Instagram /nirmala_shubham_nawale)
-
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात असलेल्या निर्मला नवले यांचे पवार कुटुंबियांबरोबर अनेक फोटो आहेत. अजित पवारांव्यतिरिक्त त्या सुनेत्रा पवार यांच्याही जवळच्या मानल्या जातात. (Photo – Instagram /nirmala_shubham_nawale)
-
मराठ आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी निघालेले असताना त्यांच्यासह सर्व मराठा आंदलोकांची राहण्याची, जेवणाची सोय कारेगावात केली असताना निर्मला नवलेही मंचावर दिसल्या होत्या. (Photo – Instagram /nirmala_shubham_nawale)
आत्मचरित्रासंदर्भात माजी लष्करप्रमुख मनोज नरवणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
