-
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी ही ‘महाशिवरात्री’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
-
भगवान शंकराच्या भक्तांसाठी हा वर्षातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो.
-
यंदा रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे.
-
या दिवशी दिवसभर उपवास आणि शंकराची आराधना केल्यास इच्छित फलप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.
-
पहाटे लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावून गळ्यात रुद्राक्ष माळ परिधान करावी.
-
मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल आणि पंचामृताने (दूध, दही, तूप, मध आणि साखर) अभिषेक करावा.
-
महादेवाला अत्यंत प्रिय असलेले बिल्वपत्र (बेल), धोतऱ्याची फुले, चंदन आणि पांढरी फुले अर्पण करावीत.
-
दिवसभर ‘ओम नम: शिवाय’ या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास निराहार उपवास करावा.
-
पूजेची सांगता ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा’ ही शिवआरती म्हणून करावी. (टीप : वरील फोटो गॅलरी ही प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
“उद्या सुनावणी…”, राजपाल यादवच्या जामिनाबद्दल मॅनेजरने दिली महत्त्वाची माहिती; सलमान खान-अजय देवगणकडून मदतीचा हात
