-
भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या घरात सध्या लग्नाघाई सुरू आहे.
-
प्रसाद लाड यांचा मुलगा शुभम लाड व डॉ. शर्मिष्ठा शिंदेबरोबर विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
शुभम व डॉ. शर्मिष्ठा यांचा विवाहसोहळा ७ मार्च रोजी राजस्थानमधील जयपूर येथे पार पडणार आहे.
-
लाड कुटुंबीयांनी सिद्धिविनायक गणपतीच्या चरणी पहिली पत्रिका अर्पण करून बाप्पाचा आशीर्वाद घेतला.
-
प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभम व डॉ. शर्मिष्ठा यांच्या लग्नाचे आमंत्रण दिले.
-
राजकीय मतभेद बाजूला सारून प्रसाद लाड यांनी स्वतः उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाला लग्नाचे आग्रहाचे आमंत्रण दिले आहे.
-
प्रसाद लाड यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ यांना शुभम व डॉ. शर्मिष्ठा यांच्या लग्नाचे आमंत्रण दिले.
-
जयपूरमध्ये लग्न असल्याने प्रसाद लाड यांनी राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ नाना बागडे यांना शुभम व डॉ. शर्मिष्ठा यांच्या लग्नाचे आमंत्रण दिले.
-
प्रसाद लाड यांनी राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी यांना शुभम व डॉ. शर्मिष्ठा यांच्या लग्नाचे आमंत्रण दिले.
-
राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांना प्रसाद लाड यांनी मुलाच्या लग्नाचे आमंत्रण दिले.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रसाद लाड/इन्स्टाग्राम)
शनीची साडेसाती बिघडवणार गेम! ‘२’ राशींच्या लोकांचं जगणं करणार कठीण, आयुष्यात आणणार वादळ? पण ‘या’ एका राशीला दाखवणार अच्छे दिन!