-
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्नी कुंती पवार यांच्यासह आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात (Maa Kamakhya Temple, Guwahati Assam) जाऊन दर्शन घेतले.
-
यावेळी त्यांचे स्नेही आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) हे देखील आपल्या पत्नीसह उपस्थित होते.
-
काही काळापूर्वी पवार कुटुंबात घडलेल्या एका दुःखद घटनेमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.
-
दर्शनानंतर भावना व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले की, “कुटुंबात घडलेल्या दुःखद घटनेमुळे रखडलेलं माँ कामाख्या देवीचं दर्शन आज अखेर मनोभावे घेतले.”
-
“दुःखाच्या काळात देवीचे हे दर्शन मनाला आत्मिक शांती देणारे आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठी बळ देणारे आहे.”
-
कामाख्या देवी मंदिर हे भारतातील ५१ शक्तीपीठांपैकी अत्यंत प्राचीन आणि जागृत पीठ मानले जाते.
-
आसाममधील गुवाहाटी येथील नीलाचल पर्वतावर वसलेले हे मंदिर आपल्या निसर्गरम्य परिसरासाठी आणि आध्यात्मिक ऊर्जेसाठी प्रसिद्ध आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रोहित पवार/इन्स्टाग्राम)
अजितदादांच्या शोकसभेत नाना पाटेकर बोलायला उभे राहिले, पण हात जोडत म्हणाले; “आज….”
