-
Marathi Bhasha Gaurav Din 2026: मराठी साहित्यातील लखलखते नक्षत्र आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा केला जातो.
-
मराठी भाषेचे संवर्धन, प्रसार आणि गौरव करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
-
कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला ‘ज्ञानभाषा’ म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर मोलाचे योगदान दिले.
-
त्यांच्या याच अतुलनीय कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१३ पासून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला.
-
राज्य शासनाने २०१३ पासून २७ फेब्रुवारी हा दिवस अधिकृतपणे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला.
-
तेव्हापासून हा दिवस शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांत उत्साहाने साजरा होतो.
-
विशेष म्हणजे, एखाद्या कवीच्या जयंतीला भाषा दिन साजरा करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.
-
या दिवशी राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कुसुमाग्रजांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो.
-
लोकसत्ताच्या सर्व वाचकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…