-
क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा, अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
अर्जुन आणि त्याची मैत्रीण सानिया चंढोक यांच्या लग्नापूर्वीच्या (Pre-wedding) कार्यक्रमांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून, या खास सोहळ्याचे यजमानपद अंबानी कुटुंबियांनी भूषवले आहे.
-
गुजरात मधील जामनगर येथे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
-
याच ठिकाणी काही काळापूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा पार पडला होता.
-
या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर यांच्यासह संपूर्ण अंबानी परिवार उपस्थित होता.
-
मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश-श्लोका आणि अनंत-राधिका यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
-
या सोहळ्याची सुरुवात मंगलमय पूजेने झाली. यावेळी नीता अंबानी यांनी अर्जुन आणि सानियासाठी एक विशेष भाषण करत त्यांचे स्वागत केले.
-
सचिन तेंडुलकरने अंबानी कुटुंबाच्या आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
-
आपला मुलगा आयुष्याची नवी इनिंग सुरू करत असल्याचा आनंद सचिनच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
-
अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा ऑगस्ट २०२५ मध्ये अत्यंत खासगी स्वरूपात पार पडला होता.
-
आता हे दोघेही ५ मार्च २०२६ रोजी अधिकृतपणे लग्नगाठ बांधणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुंबई इंडियन्स/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…