-
हातात चहाचा ग्लास घेऊन मनमुराद हासणाऱ्या मुलाचा व्हिडिओ जवळपास प्रत्येकाने इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या रिल्समध्ये पाहिला असेल. (फोटो- इन्स्टाग्राम रील स्क्रिनशॉट )
-
पण, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या मुलाबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. (फोटो- इन्स्टाग्राम रील स्क्रिनशॉट)
-
सोशल मीडियावर लाफिंग बॉय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या मुलाचे नाव अरुण कुमार असून, तो मूळचा तेलंगणाचा रहिवासी आहे. (फोटो- इन्स्टाग्राम रील स्क्रिनशॉट)
-
अलिकडेच एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्याबाबत माहिती दिली. चौथीनंतर शाळा सोडून तो ट्रकवर काम करत असल्याचे त्याने सांगितले. (फोटो – imedia youtube channel)
-
आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याने शाळा सोडून रोजगार करण्याचे ठरवले. आणि मग ट्रक क्लिनर म्हणून तो काम करु लागला. (फोटो – इन्स्टाग्राम रील स्क्रिनशॉट)
-
यावेळी त्याची ड्रायव्हर नेहरुबरोबर भेट झाली. चहा पिताना हसल्याचा व्हिडिओ नेहरु यांनीच चित्रित करुन सोशल मीडियावर पोस्ट केला, असे अरुणने सांगितले. (फोटो – imedia youtube channel)
-
इतर व्हिडिओप्रमाणे सोशल मीडियावर अरुणचा हा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला. अरुणच्या या व्हिडिओचा अनेक कॉमेडी रील्समध्ये मीम म्हणून वापर केला जातो. (फोटो- इन्स्टाग्राम रील स्क्रिनशॉट)
-
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अरुणला प्रेरणा मिळाल्याचे तो सांगतो. यानंतर त्याने शाळेत पुन्हा जाण्यास सुरुवात केली व दहावीची परीक्षाही पास झाला. (फोटो – व्हिडिओ स्क्रिनशॉट)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…