-
होळी आणि रंगपंचमीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
रंगांचा हा उत्सव उत्साह, आनंद आणि मैत्रीचे प्रतीक मानला जातो. मात्र, बाजारात मिळणाऱ्या रासायनिक रंगांमुळे त्वचेचे आणि डोळ्यांचे नुकसान होण्याची भीती असते.
-
विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेसाठी यंदा घरीच नैसर्गिक रंग तयार करणे हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
-
कोरडा लाल रंग तयार करण्यासाठी तांदळाच्या पिठात वाळलेल्या जास्वंदाच्या फुलांची पावडर मिसळा.
-
१ भाग हळद आणि २ भाग बेसन किंवा मैदा एकत्र केल्यास सुंदर पिवळा रंग तयार होतो.
-
हिरवा रंग मिळवण्यासाठी कडुनिंबाची पाने वाळवून त्याची बारीक पूड करा.
-
एक बीट किसून ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी तुम्हाला गडद गुलाबी रंगाचे पाणी मिळेल.
-
रंगांमध्ये नैसर्गिक सुवास हवा असल्यास त्यात थोडी चंदन पावडर किंवा गुलाबाचे पाणी टाका.
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…