-
Mumbai To Vijaydurg Ro-Ro Ferry Service M2M Princess: मुंबई ते विजयदुर्ग दरम्यानची बहुप्रतिक्षित रो-रो फेरी सेवा आज, १ मार्चपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.
-
या जलवाहतुकीमुळे कोकणवासीयांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर, जलद आणि आरामदायी होणार आहे.
-
मुंबईतील ‘भाऊचा धक्का’ (माझगाव डॉक) येथे महाराष्ट्र राज्य बंदरे आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
-
या सेवेच्या पहिल्याच फेरीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
-
मुंबई ते विजयदुर्ग दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी ८:०० वाजता सुटेल (दुपारी २:०० वाजता पोहोचेल).
-
विजयदुर्ग ते मुंबई दर गुरुवारी आणि रविवारी दुपारी १२:०० वाजता सुटेल (सायंकाळी ६:०० वाजता पोहोचेल).
-
प्रवासी तिकीट दर (प्रति व्यक्ती) इकोनॉमी – ३००० रुपये, प्रीमियम इकोनॉमी – ५००० रुपये, बिझनेस – ७००० रुपये, प्रथम श्रेणी – ९००० रुपये.
-
या सेवेद्वारे तुम्ही स्वतःची वाहनेही नेऊ शकता, वाहनांचे दर, एक्सएल (एक्स्ट्रालार्ज) – ९००० रुपये, एल (लार्ज) – ८००० रुपये, एम (मिडियम) – ७००० रुपये, एस (स्मॉल) – ६००० रुपये, दुचाकी – १००० रुपये, सायकल – ६०० रुपये.
-
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही सेवा कोकणातील पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…