-
आजकाल कोरियन ब्युटीच्या प्रभावामुळे अनेक जण १०-१५ उत्पादनं वापरतात; पण सारा तेंडुलकर याला अपवाद आहे. तिने ‘कमी तिथे जास्त’ (Less is More) हा मंत्र जपला असून, साधी आणि संयमी जीवनशैली स्वीकारली आहे.
-
संवेदनशील त्वचेची काळजी
साराची त्वचा मुरुमप्रवण आणि संवेदनशील आहे. त्यामुळे ती कोणतीही नवीन क्रीम किंवा सीरम लावण्यापूर्वी त्यातील घटकांचा सखोल अभ्यास करते. केवळ जाहिरात पाहून, ती उत्पादनं निवडत नाही. -
आरोग्याचा त्वचेवर परिणाम
साराला ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ (PCOS) हा त्रास आहे. त्यामुळे तिची त्वचा तेलकट होते आणि तिला मुरमे येतात. अंतर्गत आरोग्य आणि आपली त्वचा यांचा थेट संबंध असतो, याची जाणीव तिला प्रकर्षाने झाली आहे. -
योग्य उत्पादनांची निवड
त्वचेचा नैसर्गिक संरक्षक थर (Skin Barrier) टिकवून ठेवण्यावर साराचा भर असतो. ती नेहमी सौम्य फेसवॉश, हलके मॉइश्चरायझर आणि त्वचेला पोषक ठरणारी मोजकीच उत्पादने वापरते. -
सकाळची दिनचर्या
सकाळी घराबाहेर पडताना प्रदूषण आणि कडक सूर्यप्रकाश यांपासून त्वचेचे संरक्षण करणे, हा साराच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे. सनस्क्रीन आणि संरक्षक लेयर लावणे ती कधीही विसरत नाही. -
रात्रीची स्वच्छता
दिवसभर चेहऱ्यावर लावलेला मेकअप आणि धूळ रात्री झोपण्यापूर्वी नीट स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे. सारा रात्री मेकअप पूर्णपणे काढून त्वचेला मोकळा श्वास घेऊ देते, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी राहते. -
प्रयोगांऐवजी सातत्य
सतत नवनवीन उत्पादने वापरून त्वचेवर प्रयोग करण्यापेक्षा, मूलभूत गोष्टी (Basic Skincare) सातत्याने केल्यास जास्त चांगला परिणाम मिळतो, असा साराचा वैयक्तिक अनुभव आहे. -
आहार आणि व्यायाम
केवळ क्रीम लावून त्वचा सुंदर होत नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम व भरपूर पाणी पिणे यांमुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते, असे सारा ठामपणे सांगते. -
झोप आणि विश्रांती
शांत झोप हा सौंदर्याचा मुख्य आधार आहे. शरीर आणि मनाला मिळणारी विश्रांती थेट चेहऱ्यावर दिसून येते. म्हणूनच सारा आपल्या झोपण्याच्या वेळेबाबत अतिशय जागरूक असते. -
झटपट रिझल्ट देणाऱ्या गोष्टींच्या मागे न धावता, तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतलेली आणि वैद्यकीय दृष्ट्या तपासलेली उत्पादने वापरणे हाच आरोग्यदायी त्वचेचा खरा मार्ग आहे, असा संदेश सारा देते. (सर्व फोटो सौजन्य: सारा तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…