-
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अमेरिका – इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये शेकडो शाळकरी मुलींचा मृत्यू झाला. (फोटो – x/HRCPakistan)
-
होर्मोज्गान प्रांतातील मिनाब प्राथमिक शाळेवर शनिवारी अमेरिका – इस्त्रायलने हवाई हल्ला केला. यात १६५ शाळकरी मुली, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. (फोटो -Anadolu Agency)
-
या हवाई हल्ल्यात १०० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त प्रेस टीव्हीने प्रसिद्ध केले आहे. या घटनेचा इराणसह विविध देशांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. (फोटो – Anadolu Agency)
-
इराणमध्ये आज या हल्ल्यातील मृत सर्वांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या अंत्यविधीसाठी हजेरी लावली होती. (फोटो – Anadolu Agency)
-
अंत्यविधीला मृतांच्या कुटुंबीयांनी आणि मृत मुलींच्या पालकांनी आक्रोश केला. यावेळी अनेकजण मृतदेहांशी बिलगून टाहो फोडताना दिसले. (फोटो – ISNA Photo)
-
शैक्षणिक ठिकाणांवर हल्ले करणे आंतरराष्ट्रीय मानवदावादी कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हणत युनेस्कोने या घटनेवर चिंता व्यक्त केली. (फोटो – Anadolu Agency)
-
शाळकरी मुलींचे मृतदेह कॉफीनमध्ये बंद करुन त्यावर इराणचा ध्वज लावून अंत्ययात्रेत ठेवण्यात आले होते. (फोटो – ISNA Photo)
-
या हल्ल्यात मुलींना गमावलेल्या पालकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मुलींचे फोटो अंत्ययात्रेवेळी झळकावत आक्रोश केला. (फोटो – X/@Nexo_Latino)
-
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा देखील रविवारी अमेरिका – इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला आहे. (फोटो – x/@Nexo_Latino)
-
दरम्यान, शाळकरी मुलींच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी कब्रस्तानमध्ये करण्यात आलेल्या खड्ड्यांचा फोटो सर्वत्र प्रचंड व्हायरल झाला. पाकिस्तान मानवी हक्क आयोगाने देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. (फोटो – x/HRCPakistan)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…