-
Arjun Tendulkar-Saaniya Chandhok Mehendi Ceremony: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
नुकताच अर्जुन आणि त्याची मैत्रीण सानिया चंढोक यांचा मेहंदी सोहळा अत्यंत शाही थाटात पार पडला.
-
या सोहळ्याला क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
-
या खास प्रसंगी अर्जुनने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला होता, तर सानिया चंदेरी रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात अत्यंत सुंदर दिसत होती.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह उपस्थित होते.
-
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांनीही सोहळ्याला हजेरी लावली.
-
सचिनचे जुने सहकारी हरभजन सिंगने पत्नी गीता बसराबरोबर या सोहळ्याला हजेरी लावली.
-
झहीर खान पत्नी सागरिका घाटगेबरोबर उपस्थित होता.
-
युवराज सिंग पत्नी हेझल कीचबरोबर या मेहंदी सोहळ्याला उपस्थित होता.
-
युसूफ पठाण यांनी सहकुटुंब उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
-
अर्जुन आणि सानिया गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.
-
सानिया ही व्यवसायाने इव्हेंट मॅनेजमेंट आणि मॉडेलिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आहे.
-
अनेकदा हे दोघे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ANI/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…