-
क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आणि सानिया चंडोक (Saaniya Chandhok) ५ मार्च २०२६ रोजी विवाहबंधनात अडकले.
-
दक्षिण मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये हा शाही सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला.
-
या विवाह सोहळ्याला क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू, बॉलिवूडमधील नामवंत कलाकार आणि अंबानी कुटुंबासह अनेक बड्या उद्योजकांनी हजेरी लावली होती.
-
या सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
लग्नासाठी अर्जुनने लाल रंगाचा स्टायलिश कुर्ता परिधान केला होता, तर नववधू सानिया लाल रंगाच्या भरजरी साडीत अत्यंत सुंदर दिसत होती.
-
मात्र, सर्वात जास्त चर्चा रंगली ती सानियाच्या युनिक मंगळसूत्राची (Wedding Mangalsutra Design).
-
पारंपरिक काळे मणी आणि सोन्याच्या नाजूक साखळीचा मेळ घालत तयार केलेले हे आधुनिक डिझाईन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
अर्जुन आणि सानिया हे बालपणापासूनचे मित्र असून, सानिया ही अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरची देखील खास मैत्रीण आहे.
-
लग्नापूर्वी जामनगरमध्ये अंबानी कुटुंबाने या जोडीसाठी एका विशेष प्री-वेडिंग पार्टीचेही आयोजन केले होते.
-
सोशल मीडियावर चाहत्यांकडून या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अर्जुन तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…