-
भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांचा मुलगा शुभम लाड (Shubham Lad) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
शुभम आणि शर्मिष्ठा शिंदे (Sharmistha Shinde) यांचा हा विवाह सोहळा राजस्थानमधील जयपूर येथे मोठ्या थाटामाटात पार पडत आहे.
-
या शाही विवाह सोहळ्याचे काही खास फोटो खुद्द प्रसाद लाड यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
“या राजेशाही जयपूर शहरात एका सुंदर प्रवासाची सुरुवात होत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
यावेळी पाहुण्यांचे स्वागत करताना ते म्हणाले की, “शुभम आणि शर्मिष्ठा यांना आशीर्वाद देण्यासाठी दूरवरून आलेल्या आमच्या सर्व लाडक्या पाहुण्यांचे आम्ही अत्यंत आनंदाने आणि कृतज्ञतेने स्वागत करतो.”
-
“आज या सोहळ्याचा पहिला दिवस असून परंपरा, आनंद आणि आपुलकीने हा दिवस सजला आहे.”
-
राजस्थानच्या उत्साही वातावरणात आणि प्रियजनांच्या उपस्थितीत सुरू झालेला हा उत्सव सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रसाद लाड/इन्स्टाग्राम)
Sunil Gavaskar: “हे चुकीचं आहे”, बुमराहच्या षटकादरम्यान घडलेल्या प्रकारावर सुनील गावसकर संतापले; म्हणाले…