-
भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या घरी सध्या लग्नाघाई सुरू असून सनई-चौघड्यांचे सूर घुमत आहेत.
-
प्रसाद लाड यांचा मुलगा शुभम लाड हा लवकरच डॉ. शर्मिष्ठा शिंदे यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे.
-
राजस्थानमधील जयपूर येथे हा शाही विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात संपन्न होत आहे.
-
या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे आयोजित करण्यात आलेला मेहंदी आणि कौटुंबिक ‘होळी उत्सव’.
-
जयपूरच्या नयनरम्य वातावरणात लाड कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत रंगांची उधळण करण्यात आली.
-
संगीताच्या तालावर आणि आनंदाच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्वांनीच उत्साहाने सहभाग घेतला होता.
-
या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, लाड परिवारावर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रसाद लाड/इन्स्टाग्राम)
आईशप्पथ, काकू काय नाचलात… ‘राजा जी के तुरल’ गाण्यावर काकूंनी केला भोजपुरी स्टाईल डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही या वयात पण…”