-
भाजप आमदार प्रसाद लाड यांचे सुपुत्र शुभम लाड आणि डॉ. शर्मिष्ठा शिंदे यांचा विवाह सोहळा जयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
राजस्थानमधील ऐतिहासिक जयपूर शहरात अत्यंत शाही पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न होत आहे.
-
या मंगल प्रसंगी राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते आणि सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून उपस्थित राहून वधू-वरांना शुभ आशीर्वाद दिले.
-
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनीही या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून लाड परिवाराच्या आनंदात सहभाग नोंदवला.
-
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी या शाही सोहळ्याला विशेष उपस्थिती दर्शवली.
-
भाजपाच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यादेखील या सोहळ्याचे आकर्षण ठरल्या.
-
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली.
-
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आपल्या ग्लॅमरस उपस्थितीने या लग्नात मोठी रंगत आणली.
-
राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनीदेखील या शाही विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वधू-वरांचे अभिनंदन केले.
-
विविध पक्षांच्या नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावल्याने हा विवाह चांगलाच चर्चेत राहिला. (सर्व फोटो सौजन्य: प्रसाद लाड/इन्स्टाग्राम)
Women’s Day Wishes: महिला दिनाच्या द्या मराठीतून शुभेच्छा! ‘ती’चा दिवस होईल आणखी खास; WhatsApp स्टेटसला ठेवा HD फोटो…