-
अमेरिका, इराण, इस्त्रायल यांच्यातील युद्धाचा परिणाम आता भारतातही दिसून येतोय. देशातील अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.
-
त्यामुळे लोकांना आता घरगुती गॅस सिलिंडरबाबत काळजी वाटू लागली आहे. अनेक भागांत सिलिंडर बुकिंग करुनही तो वेळेत पोहोचवला जात नाही अशी स्थिती आहे, त्यामुळे सिलिंडर संपल्यानंतर पुन्हा मिळेल की नाही असा प्रश्न सतावतोय.
-
पण गॅस सिलिंडरची कमतरता भासू नये आणि परिस्थिती बिकट होऊ नये यासाठी, भारत सरकारने अनेक आवश्यक पावले उचलली आहेत.
-
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत कोणतेही संकट नाही आणि सामान्य जनतेच्या गरजा प्रथम पूर्ण केल्या जातील हे देखील स्पष्ट केले आहे.
-
त्यामुळे जर तुम्ही गॅस सिलिंडर बुक केला असेल परंतु डीलर तो देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता. ही तक्रार कुठे आणि कशी दाखल करायची ते पाहूया.
-
पूर्वी एलपीजी गॅस सिलेंडरसाठी बुकिंग कालावधी २१ दिवसांचा होता. आता ते २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आले आहे. म्हणून, एकदा तुम्ही गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर २५ दिवसांनीच तुम्ही ते पुन्हा बुक करू शकता.
-
इंडेन एजन्सीबद्दल तक्रार कुठे करावी?
जर तुमच्याकडे इंडेन गॅस सिलेंडर असेल तर
अशा परिस्थितीत, तुम्ही एलपीजी बुकिंग आणि तक्रारीसाठी ७७१८९५५५५ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तुम्ही एजन्सीच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३३५५ वर देखील कॉल करू शकता. -
एचपी एजन्सीबद्दल कुठे तक्रार करावी?
तुम्ही एचपी गॅस एजन्सीच्या ९४९३६०२२२२ या क्रमांकावर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. एचपी टोल फ्री क्रमांक १८००२३३३५५५ वर देखील संपर्क साधता येईल. -
भारत गॅस एजन्सीबद्दल तक्रार कुठे करावी?
तुम्ही कंपनीच्या ७७१५०१२३४५ या क्रमांकावर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. तुम्ही कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८००२२४३४४ वर देखील कॉल करू शकता.
UPSC परिक्षा पास होण्याच्या आनंदात मिरवणूक काढली, मुलाखती दिल्या; मात्र सत्य समोर येताच सर्वांना बसला धक्का