-
कोल्हापुरातील भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) सध्या एका सुखद कौटुंबिक सोहळ्यामुळे चर्चेत आहेत.
-
महाडिक यांच्या घरी त्यांची सून मंजिरी विश्वराज महाडिक (Manjari Vishwwaraaj Mahadik) यांचा डोहाळे जेवण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
-
या खास प्रसंगासाठी मंजिरी यांनी जांभळ्या आणि सोनेरी रंगाची सिल्क साडी परिधान केली होती, ज्यामध्ये त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मंजिरी आणि त्यांचे पती विश्वराज महाडिक (Vishwwaraaj Mahadik) यांची केमिस्ट्री लक्ष वेधून घेत आहे.
-
कुटुंबातील सदस्यांनी या जोडप्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
-
मंजिरी यांनी या फोटोंना “एका खूप मौल्यवान गोष्टीची सुरुवात…” असे भावनिक कॅप्शन दिले आहे.
-
विश्वराज आणि मंजिरी यांचा विवाह ५ मे २०२४ रोजी अत्यंत शाही थाटात संपन्न झाला होता, ज्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.
-
विश्वराज महाडिक हे सध्या भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
-
धनंजय महाडिक यांना पृथ्वीराज, कृष्णराज आणि विश्वराज ही तीन मुले आहेत.
-
आता घरात नवीन पाहुण्याचे आगमन होणार असल्याने महाडिक कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मंजिरी विश्वराज महाडिक/इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील ‘या’ नायिका आहेत सख्ख्या बहिणी, लोकप्रिय मालिकांत साकारतायत मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?