-
Ashok Kharat Case Updates: भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे शारीरिक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या विकृत अशोक खरातच्या पापाचा घडा आता भरला आहे.
-
पोलिसांनी त्याला अटक केली असून, तपासादरम्यान खरातच्या अफाट संपत्तीचा खुलासा झाला आहे.
-
समाजात वावरताना त्याने तब्बल २०० कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
-
मिळालेल्या माहितीनुसार, खरातने स्वतःसह पत्नी, मुलगी आणि जवळच्या नातेवाईकांच्या नावावर नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहता परिसरात जमिनी व भूखंडांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
-
खरात कुटुंबाच्या नावावर तब्बल १५ भूखंड आहेत. यातील ५ भूखंड स्वतः अशोक खरातच्या नावावर असून उर्वरित पत्नी कल्पना आणि मुलगी तृप्तबाला यांच्या नावावर आहेत.
-
नाशिक महापालिका हद्दीतील विल्होळी, पाथर्डी, सिन्नर आणि आडगाव परिसरातही त्याचे मोक्याचे भूखंड आहेत.
-
शिर्डी, मिरगाव, कुंदेवाडी, निघोज आणि निमगाव कोऱ्हाळे या भागात शेतजमिनींची मोठी खरेदी करण्यात आली आहे.
-
खरातने केवळ स्वतःच्याच नाही, तर कार्यालयातील कर्मचारी आणि नातेवाईकांच्या नावावरही अनेक जागा घेतल्याचे समोर येत आहे.
-
एकट्या नगर जिल्ह्यात त्याची ५ एकर मोक्याची जमीन असल्याची माहिती उघड झाली आहे.
५वीत नापास, ३ वेळा अपयश; अवघ्या २४ व्या वर्षी बनल्या IAS अधिकारी! नेहा ब्याडवाल यांची प्रेरणादायी कहाणी