-
Hanuman Jayanti 2026 Rangoli Design: हिंदू धर्मात हनुमान जयंतीला विशेष महत्त्व असून हा सण चैत्र पौर्णिमेला साजरा केला जातो.
-
सूर्योदयाच्या वेळी पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
-
यंदा २ एप्रिल रोजी देशभर हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे.
-
या दिवशी भक्त पहाटे स्नान करून हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा रामायणाचे पठण करतात.
-
हनुमंताला प्रामुख्याने सुंठ, साखर आणि खोबरे यांचे मिश्रण असलेला ‘सुंठवडा’ नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.
-
आपल्या संस्कृतीत कोणत्याही शुभ प्रसंगी घराबाहेर रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानले जाते.
-
अमरावतीची प्रसिद्ध रांगोळी कलाकार साक्षी इंगळेने (Sakshi Ingle) हनुमान जयंतीनिमित्त खास रांगोळी डिझाइन्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तुम्हीही या खास दिवशी घराच्या अंगणात मध्यभागी ‘श्रीराम’ लिहून बाजूने आकर्षक फुलांची नक्षी काढू शकता.
-
ही साधी पण सुंदर रांगोळी तुमच्या घरातील मांगल्यात अधिक भर घालेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी इंगळे/इन्स्टाग्राम)
Video: मीनाक्षी शेषाद्रींनी ३८ वर्षांपूर्वीच्या स्वत:च्याच गाण्यावर केला डान्स; अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेले काम