-
१ एप्रिल १९७६ रोजी स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझ्नियाक आणि रोनाल्ड वेन यांनी एका छोट्याशा गॅरेजमध्ये ‘अॅपल कॉम्प्युटर इंक.’ची (Apple Computer Inc.) मुहूर्तमेढ रोवली होती.
-
आज २०२६ मध्ये, तंत्रज्ञान विश्वाचा चेहरामोहरा बदलणारी ही कंपनी आपल्या प्रवासाची ५० वर्षे म्हणजेच सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे.
-
Apple I आणि II : स्टीव्ह वोझ्नियाक यांनी डिझाइन केलेले हे संगणक खऱ्या अर्थाने वैयक्तिक संगणक (PC) क्रांतीची नांदी ठरले.
-
मॅकिन्टोश (१९८४) : ‘ग्राफिकल युजर इंटरफेस’ (GUI) आणि माउस असलेला हा पहिला यशस्वी वैयक्तिक संगणक होता. याने जगभरातील संगणक हाताळण्याची पद्धतच बदलून टाकली.
-
नवनवीन उत्पादनांचे युग (२००१ – २०११) : iPod (२००१): संगीताच्या दुनियेत डिजिटल क्रांती आणली.
-
iPhone (२००७) : या एका उपकरणाने मोबाईल फोन, इंटरनेट आणि मल्टीमीडिया एकत्र आणून स्मार्टफोन उद्योगाची व्याख्याच बदलली.
-
iPad (२०१०) : टॅब्लेट मार्केटमध्ये अॅपलने नवा पायंडा पाडला.
-
स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर टीम कूक यांनी कंपनीची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. त्यांच्याच कार्यकाळात अॅपल ३ ट्रिलियन डॉलर बाजारमूल्य गाठणारी जगातील पहिली कंपनी ठरली.
-
गेल्या पाच दशकांत अॅपलने केवळ गॅजेट्स बनवले नाहीत, तर मानवाचे तंत्रज्ञानाशी असलेले नाते अधिक दृढ केले आहे.
-
‘इनोव्हेशन’ (नवनिर्मिती) आणि डिझाइनमधील उत्कृष्टता हेच या कंपनीच्या जागतिक यशाचे गमक मानले जाते.
Donald Trump on Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील ५ मुद्द्यांनी वाढवली जगाची चिंता; भारतासाठी धोक्याची घंटा?