-
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाला २८ मार्च रोजी दोन महिने पूर्ण झाले आहेत.
-
याच काळात त्यांचे सुपुत्र जय पवार (Jay Pawar) यांच्या साखरपुड्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.
-
या निमित्ताने त्यांची पत्नी ऋतुजा पाटील (Rutuja Patil) यांनी सोशल मीडियावर या सोहळ्यातील काही खास फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
-
हे फोटो शेअर करताना ऋतुजा यांनी, “आज एक वर्ष पूर्ण झाले.. ही अशी आठवण आहे जी आम्ही कायम जपून ठेवू,” असे भावूक कॅप्शन दिले आहे.
-
या सोहळ्यात जय पवार यांनी पांढऱ्या रंगाचा जोधपुरी सूट परिधान केला होता, तर ऋतुजा पाटील यांनी डिझायनर साडीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
जय पवार हे सक्रिय राजकारणापेक्षा व्यवसायात अधिक रस दाखवतात.
-
ऋतुजा पाटील या पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा पाटील/इन्स्टाग्राम)
महिनाभर भात न खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? आहारतज्ज्ञांनी सांगितले जबरदस्त परिणाम