-
Nita Mukesh Ambani Cultural Centre Third Anniversary: भारतीय कला आणि संस्कृतीचा वारसा जपणारे मुंबईतील ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ (NMACC) आता तीन वर्षांचे झाले आहे.
-
या यशस्वी प्रवासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसह विविध क्षेत्रांतील नामवंतांनी हजेरी लावली.
-
NMACC च्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त ‘एक सूर – भारत की आवाज’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
भारतीय कला आणि संस्कृतीला जागतिक स्तरावर एक नवी ओळख करून देण्याच्या संकल्पाचा हा सोहळा एक भाग होता.
-
या सोहळ्याचे यजमानपद भूषवणाऱ्या नीता अंबानी यांच्या सौंदर्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
-
नीता अंबानी यांनी परिधान केलेली सोनेरी रंगाची सिल्क साडी आणि त्यावरील नजाकतदार दागिन्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
विकी कौशल आणि संजय दत्त या दोघांच्या खास उपस्थितीने सोहळ्याची रंगत वाढवली.
-
‘पॉवर कपल’ रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी ब्लॅक आउटफिटमध्ये सर्वांचे लक्ष वेधले.
-
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या जोडीची केमिस्ट्री सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली.
-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांच्यासह उपस्थित होते. विशेष म्हणजे, अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानिया चांदोक ही पहिल्यांदाच कुटुंबासोबत अशा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आली.
-
याव्यतिरिक्त काजोल, सुनील शेट्टी, जावेद अख्तर, शबाना आझमी, ए.आर. रहमान आणि नीतू कपूर यांसारख्या नामवंतांनी रेड कार्पेटवर आपली झलक दाखवत सोहळ्याची शोभा वाढवली.
-
(सर्व फोटो सौजन्य : नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र/इन्स्टाग्राम)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प