-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा (Baramati Assembly Constituency) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
-
या निवडणुकीसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेच्या तपशिलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती ९१ कोटी रुपये आहे.
-
यामध्ये स्थावर मालमत्ता : ६७ कोटी ६७ लाख रुपये, जंगम मालमत्ता : २३ कोटी २५ लाख रुपये, बँक ठेवी : १० कोटी ५८ लाख रुपये, रोख रक्कम: ९ लाख ७५ हजार रुपये.
-
सुनेत्रा पवार यांच्याकडे सोन्या-चांदीचा मोठा साठा असून त्यात ३५ किलो चांदी, ८६० ग्रॅम सोने आणि १६९ ग्रॅम हिऱ्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
-
विशेष म्हणजे, त्यांच्या ताफ्यात ट्रॅक्टर, दोन ट्रेलर आणि एक इनोव्हा अशी वाहनेही आहेत.
-
संपत्तीसोबतच त्यांच्यावर १६ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहितीही समोर आली आहे.
-
शैक्षणिक पात्रतेबाबत सांगायचे तर, त्यांचे शिक्षण बी.कॉम (B.Com) पर्यंत झाले असून, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल नाही.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुनेत्रा पवार/इन्स्टाग्राम)
डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली? अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीत नेमके काय?