-
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Baramati Election 2026) जाहीर झाली आहे.
-
या निवडणुकीसाठी स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या (Swarajya Shakti Sena) वतीने करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्या निमित्ताने त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची एकूण संपत्ती समोर आली आहे.
-
करुणा मुंडे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण मालमत्ता १० कोटी ३४ लाख रुपये इतकी आहे.
-
यामध्ये २.३४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि ८ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. त्यांच्याकडे सध्या ३० हजार रुपये रोख स्वरूपात आहेत.
-
प्रतिज्ञापत्रानुसार, करुणा मुंडे यांच्या विविध बँकांमध्ये ८७ लाख रुपयांच्या ठेवी असून, आयसीआयसीआय (ICICI) पॉलिसीमध्ये त्यांनी १७ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
-
वाहनांचा विचार केल्यास, त्यांच्याकडे २३ लाख रुपये किमतीची ‘महिंद्रा थार’ ही कार आहे.
-
तसेच, त्यांच्याकडे सुमारे ९०० ग्रॅम सोने असून त्याचे अंदाजे बाजारमूल्य १.२४ कोटी रुपये इतके आहे.
-
करुणा मुंडे यांच्यावर सध्या २० लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या स्थावर मालमत्तेमध्ये मुंबईतील निवासस्थान आणि इंदूरमधील एका घराचा समावेश आहे, ज्याची एकत्रित किंमत ८ कोटी रुपये आहे.
-
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : करुणा मुंडे/इन्स्टाग्राम)
Donald Trump Iran Peace Aid Update: “आता सुवर्णकाळ येईल”, युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची सकारात्मक पोस्ट; इराणच्या पुनर्बांधणीसाठी दिला मदतीचा हात